ग्रामपंचायत उभाडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

जिल्हा परिषद शाळेमध्ये CCTV कॅमेरे

wq

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त, तसेच शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी निरीक्षण करता येईल. पालकांना त्यांच्या मुलांचा सुरक्षिततेबाबत विश्वास वाटेल व शाळेचे वातावरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनेल.

पाणीपुरवठा टाकी

x

ग्रामस्थांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावामध्ये पाणीपुरवठा टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या माध्यमातून घरगुती तसेच शाळा, अंगणवाडी, आणि सार्वजनिक ठिकाणी नियमित पाणीपुरवठा केला जातो. यामुळे गावकऱ्यांना स्वच्छ पाणी सहज उपलब्ध होऊन आरोग्यदायी जीवनमान राखण्यास मदत होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

w

गरीब व गरजू कुटुंबांना सुरक्षित, भक्कम आणि स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान व आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पक्के घर बांधण्यात मदत केली जाते.

समाज मंदिर दलितवस्ती

ww

दलितवस्तीमध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी समाज मंदिर बांधण्यात आले आहे.

कानिफनाथ मंदिर व सभागृह

c

ग्रामस्थांच्या धार्मिक श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी कानिफनाथ मंदिराचे बांधकाम तसेच सभागृह उभारण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन यांसह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.

आरोग्य केंद्र कँम्प

006

ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित तपासणी, रोगप्रतिबंधक लसीकरण व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात येतात.