ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
ग्रामपंचायत उभाडे
यशोगाथा :-उभाडे गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. उभाडे हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग लगत वसलेले असून उभाडे गाव औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर असून गावामध्ये तांदळाचे भाजीपाला काकडी वांगी गहू भुईमुग मका बाजरी ,ज्वारी इत्यादी उत्पादन करण्यात येते.. उभाडे गाव हे दारणा तिरावर वसलेले असून गावा लगत भाम , वाकी खापरी, भावली कवडदरा , दारणा , वैतरणा मुकणे असे ७ धरणे व त्रिंगळवाडी, कांचनगाव, वाडीवऱ्हे, खेड येथे बंधारे उभारण्यात आलेले आहे. सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येते असतो. उभाडे पिंपळगाव मोर धामणी उंबरकोण देवळे इत्यादी गाव महत्वाचे ठिकाण आहे.
उभाडे गावालगत धार्मिक स्थळे कावनई कपिलधारा तिर्थ , सर्वतीर्थक्षेत्र टाकेद , विपश्यना केंद्र इगतपुरी, गजानन महाराज तपोभूमी कावनई इत्यादी तीर्थक्षेत्र असून उभाडे गाव हे घोटी इगतपुरी जंक्शन रेल्वे स्टेशन लगत आहे.
*ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे आहे.
*ग्रामपंचायत पुरस्कार :- ग्रामपंचायतीला शासकीय स्पर्धा स्तरावर महा आवास पुरस्कार, चंदेरी प्रमाणपत्र असे पुरस्कार मिळाले आहेत.
* शैक्षणिक संस्था बाबत माहिती :- गावात प्राथमिक जि.प. शाळा – २ , खाजगी माध्यमिक शाळा – १ , अंगणवाडी केंद्र ४ आहेत अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी आहेत.
*पाणीपुरवठा:- सध्या स्थितीत पाणीपुरवठा योजना चालू असून गावामध्ये २ टाक्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. कातकरी वस्ती वरती २ टाक्या बसविण्यात आल्या आहेत उभाडेवाडी येथे पाण्याची टाकी आहे . तसेच जल जीवन मिशन अंतर्गत संपूर्ण गावाला पाण्याची टाकी बांधून प्रत्यक घरी नळ कनेक्शन दिलेले आहेत.
* हगणदारी मुक्त गाव :-घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.
*भूमिगत गटार:- शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.
*अंगणवाडी :- गावात ४अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात.
*सामाजिक वनीकरण:- ग्रा.प.तर्फे सामाजिक वनीकरण १ हेक्टर मध्ये दारणा नदी लगत विविध वृक्षांची लागवड केलेली आहे.
*यात्रा महोत्सव:- दरवर्षी गावात अंबिका माता यात्रा उत्सव भरते तसेच गणेश उत्सव व नवरात्र उत्सव देखील जोरात साजरा होतो.
*अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजना :- अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजनाचा माध्यमातून हाय मास्ट लाईट, कॉँक्रीट रस्ते, बंदिस्त गटारी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
*बुध्द विहार :- गावातील दलित वस्ती येथे बुध्द विहार उभारले असून त्यामध्ये बुध्दांची व बाबासाहेव आंबेडकरांच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार : ~51%
- गौण कामगार : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
उभाडे ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!
ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:
Facebook: UbhadeGrampanchayat
फोटो गॅलरी








